कायद्यातील श्लील-अश्लीलच्या कसोट्या नेमक्या आहेत तरी काय? कायद्याच्या परिभाषेत नेमके कशाला ‘अश्लील’ समजावे?
‘अभिरुची’, ‘रसिकता’ या जर मानवी मनावर प्रतिबिंबित होणाऱ्या भावक्रिया असतील, तर ‘श्लील-अश्लील’ या संज्ञा, संकल्पनांचेही तसेच आहे. आणि जर या प्रतिक्रिया व्यक्तिपरत्वे बदलतील, तर कायद्याला ‘श्लील-अश्लील’ मोजण्याचे वस्तुनिष्ठ मानक कसे बनवता येईल? म्हणजेच, समीक्षक जसा आपल्या मगदुराप्रमाणे एखादी कलाकृती अभ्यासतो, तसे त्या कलाकृतीतील श्लील-अश्लीलही तपासता येते? पण मग त्यासाठी कायद्याचे वस्तुनिष्ठ निकष कोणते?.......